भडकंबा येथे महेंद्र मोरे यांनी केली सौरपथ दीपाची व्यवस्था

साखरपा : भडकंबा गावातील पाकतेकरवाडी, बनेवाडी या दुर्गम भागात वसलेल्या वाड्या आहेत. तेथील रहदारीची पायवाट व रस्त्याचे धोकादायक वळण येथे असलेला अंधार तसेच बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता येथे लाईटची गरज ओळखून भडकंबा मोरेवाडीमधील मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या ७ ऑक्टोबर या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी सौर पथदिव्याची व्यवस्था करून दिली. महेंद्र यशवंत मोरे हे उत्कर्ष कुणबी संस्था व केदारलिंग ग्राम विकास मंडळ भडकंबा, मुंबईचे सचिव असून शिवसेना (उबाठा) पक्षाचे साखरपा दाभोळे विभागाचे विभाग संपर्क प्रमुख आहेत. अशा अनेक माध्यमांतून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ते नेहमीच अग्रेसर आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त ते जरी मुंबई शहरात वास्तव्यास असले तरी त्यांची नाळ ही गावाच्या मातीची घट्ट जुळलेली आहे. गावाच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. गेल्याच वर्षी त्यांनी त्यांच्या मोरेवाडी येथील सहकाऱ्यांच्या मदतीने सौर पथदीपाची व्यवस्था करून वाडी उजळून टाकली आहे. ही व्यवस्था केल्याबद्दल वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून – महेंद्र मोरे यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:41 PM 16/Oct/2024