गुरुपौर्णिमेला पावस समाधी मंदिरात ४२ जणांनी केले रक्तदान

पावस : स्वामी स्वरूपानंद मंडळ पावस व धन्वंतरी धर्मादाय संस्था यांच्यावतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून समाधी मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४२ स्वामीना गुरुदक्षिणा म्हणून रक्तदान करून आपले कर्तव्य बजावल.

रत्नागिरीतील धन्वंतरी धर्मादाय संस्था परिसरातील रक्ताची गरज ओळखून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करते. यावर्षी या संस्थेच्या माध्यमातून १८ ठिकाणी रक्तदान शिबिरे झाली. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसरामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. समाधी मंदिर परिसराला भेट देणाऱ्या अनेक भक्तांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन शिबिर यशस्वी करण्यास हातभार लावला.

या संदर्भात धन्वंतरी संस्थेचे अध्यक्ष अजय भिडे म्हणाले, सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक लाभार्थीला वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि त्याचा जीव वाचावा, या प्रमुख उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात १८ रक्तदान शिबिर यांचे आयोजन करून रक्तसंकलनाचे काम हाती करण्यात आले. त्याचा समाजातील विविध लोकांना चांगल्या त-हेने उपयोग होत आहे. हे रुग्णसेवेचे काम सातत्याने चालू राहावे या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तसंकलन केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 12/Jul/2025