चिपळूण : महाराष्ट्र काथ्या धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित काथ्या उद्योगाचे संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी मोफत वाजता होणार आहे. एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
कोकण विभाग काथ्या उद्योग व्यवसायामधील विविध उद्योगसंधी याबाबतची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणार आहे. त्याचबरोबर शासकीय योजनांवरील अनुदानाची माहितीही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कर्ज उपस्थित राहणाऱ्या बेरोजगार युवक, युवती, महिला, माजी सैनिक, अपंग, बचतगट सदस्य सर्वांना नारळाच्या सोडण्यापासून काथ्या तयार करून त्यापासून दोरी, मॅक्स, पायपुसणी, विविध फॅशनेबल वस्तूंची निर्मिती करणे याबाबतच्या लघुद्योगासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.
पुढील ३० दिवसांचा मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम चिंचनाका येथे एक महिना असेल. त्यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे पूर्ण आणि सातवी पास असणाऱ्या युवक-युवतींना कार्यक्रमात सहभागी होता येईल, मोफत प्रशिक्षण पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र आणि २००० विद्यावेतन दिले जाईल. इच्छुक युवक-युवती महिलांनी १५ रोजी आयटी मेन्टॉर्स चिपळूण येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे लघुउद्योग विकास महामंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 12/Jul/2025














