चिपळूणमध्ये उद्या कला प्रदर्शन

चिपळूण : चिपळूणमध्ये प्रथमच शोध सृजनाचा… जागर कौशल्याचा या नावाने एक भव्य आणि प्रेरणादायी कलाप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १३ जुलै रोजी सावरकर सभागृह, चिपळूण येथे भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन दुपारी ३. ते सायं ७.३० या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. हे प्रदर्शन निता आर्टस् आणि ग्राम कौशल्य फाऊंडेशन, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भरवले जात आहे.

चिपळूणमधील दोन महिला कलाकारांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार नीता साडविलकर यांचे विविध माध्यमातील सर्जनशील कलाविष्कार सादर करण्यात येणार आहेत. तसेच प्राची जोगळेकर हिने जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे यशस्वीरित्या प्रदर्शित केलेल्या चित्रांचे सादरीकरण देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन करताना ग्राम कौशल्य फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद जोगळेकर यांनी सांगितले की, ही एक सुवर्णसंधी असून, चिपळूणातील कलाप्रेमींनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, गृहिणींनी, बचत गटांच्या महिला सदस्यांनी स्वतःची कलाक्षमता शोधणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन जरूर पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 12/Jul/2025