गणेशोत्सवासाठी टप्प्याटप्प्याने आरक्षण देण्याची मागणी

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसठी टप्प्याटप्प्याने आरक्षण देण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून ६० दिवस आधी आरक्षण दिले जाते.

यंदाच्या वर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या फुल्ल झाल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे. यासाठीच रेल्वे प्रशासनाने तारखेनुसार ४५ दिवस, ३० दिवस, १५ दिवस इत्यादी टप्याटप्प्यांनी आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) पद्धतीने गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग उघडण्याचा विचार करावा, अशी मागणी समितीची मागणी आहे.

सध्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अप् आणि डाऊन दोन्ही दिशांसाठी एकाचवेळी सुरू केले जाते. त्यामुळे तिकिटे उघडल्यानंतर काही मिनिटांतच गाड्या फुल होतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी निश्चित एआरपी शक्य नसल्यास अप् आणि डाऊन दिशांसाठी बुकिंग वेगवेगळ्या तारखांना उघडावे, जेणेकरून प्रवाशांना त्यांचा संपूर्ण प्रवास नियोजन करण्याची संधी मिळेल, असे संघटनेकडून सूचित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 12-07-2025