गुहागर :ग्रामपंचायत मुंढर कातकिरी अंतर्गत मुंढर खुर्द वळवणवाडी येथील क्षेत्रफळ देवस्थान ते अंतर्गत रस्त्याला दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.
वृक्ष लागवडीमध्ये विविध प्रकारची 150 झाडांची लागवड करण्यात आली.
सदर लागवडीसाठी मुंडर खुर्द प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ त्यांचेमार्फत वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले व त्यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. सदर वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे आहे सामाजिक वनीकरण विभागाचे श्री . निमकर श्री.गायकवाड , श्री. पवार सरपंच सौ.अमिषा गमरे , सौ.भक्ती धनावडे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप अवेरे , रविंद्र चिले पोलीस पाटील किरण धनावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 12-07-2025














