राजापूर : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रायपाटण येथील श्रीपाद चव्हाण जिल्ह्यात प्रथम

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १च्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेतील श्रीपाद विठोबा चव्हाण याने पाचवीच्या परीक्षेत ९४.६६ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तो राज्यात आठव्या क्रमांकावर आहे.

तसेच याच शाळेतील सुश्लोक स्वप्निल गांगण याने ६९.३३ टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत १२४ वा क्रमांक मिळविला आहे. या परीक्षेला शाळेतून सहा विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर गुरव, उपाध्यक्ष सिद्धेश चांदे, माजी मुख्याध्यापिका नीलम थरवळ, मुख्याध्यापिका तांबे यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. तसेच रायापाटण शाळा क्रमांक ३ ची विद्यार्थिनी हर्षिता म्हात्रे जिल्हा गुणवत्ता यादीत ५९ वी आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 12/Jul/2025