मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी : शहरातील परटवणे तिठा येथील बंद टपरीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. साहित्यासह ३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संतोष यशवंत मयेकर (वय ५१, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १०) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास परटवणे तिठा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित हा विनापरवाना मटका जुगार चालवत होता. त्याच्याकडून साहित्यासह ३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अमित कदम यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 12-07-2025