चैन्नईमध्ये मुसळधार पाऊस; सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यात शिरलं पाणी

नवी दिल्ली : चेन्नईसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततधार पाऊसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान सुपरस्टापर रजनीकांत यांच्या आलिशान घरामध्येही पाणी शिरलं आहे.

रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील बंगल्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. या परिसरात इतरही सेलिब्रिटी आणि दिग्गज नेत्यांची घरं असून त्यांच्या घरातही पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय सुरु आहेत.

चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

चेन्नईमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार आणि संततधार पाऊस सुरु असल्याने शहरात अनेक भागांत पाणी साचलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरातही पाणी शिरलं याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोरदारा पावसामुळे पाणी साचल्याने शहरातील जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी

सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये संपूर्ण रस्ता पाण्याने भरलेला दिसत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या घराबाहेरही पाणीच पाणी दिसत आहे. पावसामुळे जवळपासच्या सेलिब्रिटींच्या घरांनाही फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे. चेन्नईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरातच नाही तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. इतर अनेक सेलिब्रिटींच्या घरातही पाी शिरलं आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

प्रशासनाकडून ड्रेनेजचं काम सुरू

वृत्तानुसार, चेन्नई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी ड्रेनेजचे काम सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी रजनीकांत यांच्या निवासस्थानाच्या आसपासचे पाणी बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, रजनीकांत यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. असे म्हटले जाते की सुपरस्टार त्याच्या घराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 16-10-2024