रत्नागिरी : स्वामींच्या अगाध भक्तीचा महिमा सांगणारे आणि याच भक्तिभावातून स्फुरलेले “स्वामीराया” हे नवीन गीत संकल्प कलामंचच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यामध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक श्री. धर्मेंद्र सावंत यांच्या हस्ते थाटात प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष श्री. विनयराज उपरकर, आण्णा वायंगणकर, गुळवणी सर, डॉक्टर दिलीप पाखरे, श्री. पाटील, डॉक्टर शेरे, डॉ. कल्पना मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गायक गुरुदेव नांदगावकर यांच्या सुमधुर आवाजात हे स्वामी गीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे. या गीताची संकल्पना, गीत आणि संगीत वैभव पुरुषोत्तम नांदगावकर, आडिवरे यांची आहे. साईल शिवगण, नवलाई म्युझिक प्रोडक्शन, नाचणे, रत्नागिरी यांनी या गीताचे संगीत संयोजन आणि रेकॉर्डिंग केले आहे, तर अखिल माने यांनी संकलन केले आहे. या व्हिडिओ गीतामध्ये श्री. विजय मायंगडे आणि गार्गी शेलार यांनी अभिनय केला आहे.
पूर्णतः रत्नागिरीमध्ये बनलेले हे व्हिडिओ स्वरूपातील गीत ‘Morya Creation’ या YouTube चॅनलवर उपलब्ध असून, “स्वामीराया” हे गीत आता रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. स्वामींच्या भक्तीचा अनुभव देणारे हे गीत अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहे.













