रत्नागिरी : रत्नागिरी शहरात मच्छर नियंत्रण करण्यासाठी धूर फवारणी सुरू झाले आहे. धूर फवारण्यासाठी १० यंत्रे वापरली जात आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हे धूर फवारणी सुरू झाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ही धूर फवारणी केली जात आहे.
रत्नागिरी शहराच्या वरच्या भागातून धूर फवारणी सुरू झाली असून गेल्या दोन आठवड्यात अर्ध्या शहरात धूर फवारणी पूर्ण झाली आहे. आता शहराच्या खालच्या भागात धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात संपूर्ण शहरात धूर फवारणी पूर्णत्वास जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 14/Jul/2025














