पाचल : छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत तळवडे येथे आयोजित केलेल्या शिबिरात निवडणूक नायब तहसीलदार मृणालिनी शेळके यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, आजिवली सरपंच संजय राणे, मूर सरपंच वैष्णवी आगटे, माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, माजी सरपंच खुशिराम मोरे, शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख सुनील गुरव, उपविभाग प्रमुख युवराज मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील कोलते यांनी मूर सजामध्ये गेले दोन महिने कोणीही तलाठी फिरकलेला नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र सेवा हमी कायद्याचा बोर्ड एकाही तलाठी कार्यालयात नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून याबाबत सवाल उपस्थित केला.
प्रगतीशील शेतकरी सुरेश गुडेकर यांनी जिवंत सातबारा योजना राबविताना किती नोंदी मंजूर झाल्या, किती नामंजूर झाल्या व किती मयत खातेदारांची खात्यावरून नावे कमी झाली, अशी विचारणा केली. या शिबिराचे उत्तम नियोजन तळवडेच्या तलाठी कमळ जाधव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 14/Jul/2025














