अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे आमदार शेखर निकम यांना निवेदन

कडवई : नवीन संचमान्यतेच्या निर्णयासंदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या मागण्यासंदर्भात आमदार शेखर निकम यांची भेट घेत निवेदन सादर केले. तसेच संच मान्यतेच्या आदेशासंदर्भात विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश सावर्डेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण सावंत, सदस्य आनंद देशपांडे, मनोज घाग, सय्यद आदम, अजय उपरे, अरविंद पवार, रवींद्र शिवडे, अजित कांबळे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 14/Jul/2025