चिपळूण : तालुक्यातील ओवळी बौद्धवाडी येथील विलास मोहिते यांच्या गुरांच्या गोठ्यात शिरून बसलेल्या बिबट्याला वन विभागाने पिंजराबंद केले आहे. तो जखमी असल्याने त्याला तातडीने पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले.
मोहिते यांच्या गोठ्यात बिबट्या येऊन बसत होता. ही माहिती वन विभागास कळवली असता वनपाल एस. एस. सावंत, कृष्णा इरमले, वनरक्षक कोळकेवाडी, राहुल गुंठे, वनरक्षक रामपूर यांनी ओवळी येथे जाऊन गुरांच्या गोठ्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्या असल्याचे आढळले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ११ रोजी वन विभागाने पिंजरा आणून त्यात बिबट्याला बंदिस्त केले.
पिंजऱ्यात भक्ष ठेवले. त्या रात्री ८.३० वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याची पाहणी केली असता तो नर असून सुमारे ४ ते ५ वर्षांचा असल्याचे आढळले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 14/Jul/2025














