रत्नागिरी : जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल नाचणे क्र. १ (ता. रत्नागिरी) जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी आनंदोत्सव साजरा केला.
जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांची निवड होणे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असून त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याची नोंद घेतल्याने अधिक आनंद झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व किल्ल्यांची माहिती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मुलांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी शाळेतील शिक्षक शरदिनी मुळे, दीपक नागवेकर, विनोदिनी कडवईकर, विद्या कोकजे,पूजा हळदणकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 14-07-2025














