खेड बसस्थानकाजवळ वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

खेड : खेड-दापोली मार्गावर खेड बसस्थानकाजवळ कन्हैया कुल्फी सेंटरसमोर पीकअप टेम्पो रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे उभा केल्याच्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. १० जुलै) सकाळी सुमारे ११.३० च्या सुमारास घडला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी समीर नुर अहम्मद खान (वय ४९, रा. घाणेखुंट, लोटे, ता. खेड) याने आपल्या ताब्यातील पीकअप टेम्पो (क्रमांक MH-०८-W-३५४८) खेड बसस्थानकाजवळ अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केल्याने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा व पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 14/Jul/2025