गुहागर : कचऱ्यातील पोषण आहाराच्या पाकिटांच्या चौकशीचे आदेश

गुहागर : तालुक्यातील जानवळे फाट्याजवळ शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे कचऱ्यात टाकल्याचा प्रकार उघड झाला होता.

गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ यांच्या समवेत घटनास्थळी जाऊन कचऱ्यात टाकलेली शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे पंचनामा करून ताब्यात घेतली व तत्काळ चौकशीचे आदेश दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 14/Jul/2025