चिपळूण : अतिवृष्टीमुळे घटना भूस्खलनासारख्या घडत असल्याने त्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील संरक्षक भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय चिपळूण नगर परिषदेने घेतला आहे. या अनुषंगाने नगर परिषदेच्या आर्किटेक्ट पॅनेलवर असणाऱ्या रूमाज कन्सल्टिंग अॅण्ड इन्फ्रा या संस्थेला हे स्ट्रक्चरल ऑडिट करून तांत्रिक लेखी अभिप्राय (अहवाल) सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे शहरातील खेंड कांगणेवाडी परिसरात दरडीसह संरक्षक भिंत कोसळली होती. यामुळे येथील घरांना व एका इमारतीला धोका निर्माण होऊन नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ ओढावली आहे. या घटनेची नगर परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. शहरात मागील ३ वर्षात विविध ठिकाणी संरक्षक भिंतीची बांधकामे करण्यात आलेली आहेत. काही कामे सुरू असून, प्रगतीपथावर आहेत. या कामांपैकी जवळपास ३४ कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी रूमाज कन्सल्टिंग अॅण्ड इन्फ्रा, चिपळूण या संस्थेला पत्रव्यवहार करत संबंधित कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आपला तांत्रिक लेखी अभिप्राय मागविला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 14/Jul/2025














