राजापूर : तालुक्यातील विल्ये विभागामध्ये खासगी मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्कची मोबाइलधारकांना दर्जेदार सेवा दिली जात असताना बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. या भागामध्ये बीएसएनएल सेवा गेल्या दोन महिन्यांपासून असून नसल्यासारखी झालेली आहे.
आयडिया, जीओसारख्या खासगी कंपन्यांकडून दर्जेदार सेवा दिल्या जात असतानाही तालुक्यातील विल्ये परिसरातील अनेकांकडून शासनाची बीएसएनएल सेवा असल्याने बीएसएनएल ही सेवा घेण्याला अधिक प्राधान्य दिले आहे; मात्र ग्राहकांकडून दाखवण्यात आलेला विश्वास आणि ही सेवा घेण्याला प्राधान्य देण्याचा घेतलेले निर्णय बीएसएनएलने चुकीचा ठरवल्याचे चित्र दिसत आहे. गावोगावच्या कानाकोपऱ्यात खासगी कंपन्यांचे नेटवर्क आणि रेंज चांगल्यागतीने मिळत असताना बीएसएनएलची रेंज आणि इंटरनेटचा बीएसएनएलच्या ग्राहकांना शोध घ्यावा लागत आहे. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बीएसएनएल सेवाच ठप्प झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे करणे ग्राहकांना मुश्कील झाले आहे.
बीएसएनएलचा टॉवर असूनही विल्ये विभागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प आहे. कधी मोबाइलला रेंज नसते तर कधी इंटरनेट सेवा खंडित झालेली असते. एकंदरीत, बीएसएनएल सेवा असून नसल्यासारखी झाली आहे. यावर बीएसएनएल कंपनीकडून तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. – संदीप तावडे, ग्राहक, बीएसएनएल
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 15/Jul/2025














