Ratnagiri : वेगवान वाऱ्यांमुळे मासेमारीत अडथळा

रत्नागिरी : परतीचा पाऊस अजूनही ठाण मांडून बसला असल्याने वादळी वारे, पाऊस यांचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. तीन ते चार दिवसांचा समुद्रात प्रवास करूनही जाळ्यात मासे मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मासेमारी नौका अजूनही समुद्र किनाऱ्यावार विसावा घेत आहेत.

त्यामुळे माशांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात अडीच हजार मासेमारी नौका आहेत. मासेमारीवरच येथील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या समुद्रात टाकलेल्या जाळ्यांमध्ये मासेच येत नसल्याने येथील मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. समुद्रात तीन ते चार दिवस प्रवास करूनही मासे जाळ्यात सापडत नसल्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या नौका रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली आहे. आवक घटल्यामुळे माशांचे दरही वधारले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 16-10-2024