रॉयल एनफिल्ड शोरूममधून बुलेटची चोरी

चिपळूण, दि. १५ जुलै: चिपळूण तालुक्यातील सती येथील रॉयल एनफिल्ड शोरूममधून एक बुलेट मोटारसायकल चोरल्याप्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्ती आत्माराम मेस्त्री (वय २६, रा. नागावे, ता. चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२५ रोजी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास सती येथील रॉयल एनफिल्ड शोरूममध्ये ही चोरीची घटना घडली. शोरूमचे मालक सर्वेश उमेश साळुंखे (वय २२, रा. मार्कडी, चिपळूण) यांनी याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, सुरज सुनील चव्हाण (रा. मार्ग ताम्हाणे) यांनी सर्व्हिसिंगसाठी लावलेली एमएच-०८-एडब्ल्यू-७०७१ क्रमांकाची काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेट मोटारसायकल आरोपी मास्ती मेस्त्री याने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि फसवणुकीच्या उद्देशाने चोरून नेली. चोरलेल्या बुलेटची किंमत अंदाजे १,२०,००० रुपये आहे.

याप्रकरणी, चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा (गु.र.नं. १६२/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 15-07-2025