रत्नागिरी : भाकर सेवा संस्थेच्या वर्धापन दिनी अॅड. अश्विनी आगाशे यांना “अरुणा पुरस्कार” प्रदान

रत्नागिरी : श्रीमती अरुणा पाटील व श्री देवेंद्र पाटील यांनी १३ ऑक्टोबर १९९३ मध्ये भाकर सेवा संस्थेची स्थापना केली. समाजातील अनेक समस्या व प्रश्न यांना समोर ठेवून भाकर सेवा संस्था ही शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण या विषयांवर काम करते. आज पर्यंत भाकरने अक्षय प्रकल्प, कुळांच्या हक्कांसाठी काम, खाण कामगार यांच्या मुलांसाठी बालवाड्या, आधुनिक शेती प्रकल्प, महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्ष, गुजरात भूकंप मदत कार्य, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास, जल जीवन मिशन, आजी आजोबांचा गाव, महिला पुनर्वसन केंद्र असे विविध सामाजिक प्रकल्प राबविले आहेत.

दिनांक १३/१०/२०२४ रोजी भाकर सेवा संस्थेचा ३१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे PSI श्री. पवन कांबळे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते हे मान्यवर म्हणून लाभले. PSI श्री. पवन कांबळे यांनी संस्थेच्या ३१ वर्षाच्या वाटचालीचे कौतुक केले तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे डॉ. रामा सरतापे यांनी संस्थेला नवीन प्रकल्प बाबत मार्गदर्शन करून भविष्यात अजून संस्था व्यापक स्वरूपात जाऊन पूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करावी अशी आशा व्यक्त केली तसेच देवेंद्र पाटील व अरुणा पाटील या आजच्या काळातील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले आहेत असे मनोगत व्यक्त केले.

श्री. युयुत्सु आर्ते यांनी संस्थेच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला व त्याचसोबत संस्थेने नाविन्यपूर्ण अजून प्रकल्प करावे यासाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. श्रीमती अश्विनी मोरे यांनी संस्थेच्या ३१ वर्षीय प्रवास चे वर्णन पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन च्या माध्यमातून केले. दरवर्षी भाकर सेवा संस्था अरुणाताई यांच्या कामाला स्मरून आपल्या समाजासाठी सामाजिक काम करणाऱ्या एका महिलेच्या सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेवून त्या महिलेला अरूणा पुरस्कार देवून सन्मान करत असते या वर्षी समाजसेविका अॅड. अश्विनी आगाशे यांचा अरूणा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

अश्विनी ताई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सामाजिक काम करण्याचा अनुभव सर्वांसमोर मांडला. त्याचबरोबर भाकर सेवा संस्था ही सामाजिक काम करण्याऱ्या १०० लोकांचा दर वर्षी भाकर मित्र पुरस्काराने सन्मान करते यावर्षी रेशम जाधव, मानसी माने, श्रीराम पाध्ये, अमृता तांडेल, प्रकाश खानविलकर, दिपक पाटील, नम्रता तांबडे, मतीन बावानी, नजीर मुल्ला, स्वाती सावंतदेसाई, देवयानी सावंत, सायली भागवत, जनार्दन कांबळे, मानसी भाटकर, कविता करांडे, सुर्यकांत माने, दर्शना शिंदे, सुनील माने, स्मिता पिलनकर, निलेश भाटकर यांना भाकर मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला भाकर सेवा संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील, अध्यक्ष श्रीमती मंगल पोवार, सचिव श्रीमती अश्विनी मोरे, खजिनदार श्रीमती प्रतिक्षा सोलीम, संचालक श्री. पवनकुमार मोरे, संचालक श्री विलास पेरळेकर, संचालक समिता घडशी तसेच भाकर संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 16/Oct/2024