रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती मागवल्या

रत्नागिरी : जि.प. व पं.स. प्रभाग रचनेवर प्रारुप प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या १४ जुलै २०२५ च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत दर्शविलेल्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत आहे.

उक्त मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दि. २१ जुलै २०२५ नंतर विचारात घेण्यात येणार आहे.

आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयातील फलकावर, तहसीलदार मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर तसेच पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर करण्यात आली आहे.

आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी हरकती जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी प्राधिकृत केलेले हरकत असलेल्या निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी प्राधिकृत केलेले हरकत असलेल्या निवडणूक विभागाचे संबंधित तहसीलदार यांच्याकडे आलेली हरकती विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 15/Jul/2025