रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पात्री विसापूर येथे एका चालकाच्या घरासमोरून उभी असलेली पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १० जुलै २०२५ रोजी रात्री ११.३० ते ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुबीन हुसेन नांदगावकर (वय ३६, व्यवसाय चालक, रा. पात्री विसापूर, ता. दापोली) यांनी १५ जुलै २०२५ रोजी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गु.र.नं. १३४/२०२५ अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुबीन नांदगावकर यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची एम.एच.०८ ए.एन.५११८ क्रमांकाची ४०,००० रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल (चेसिस नं. D2A13EY2HCC ४८१७६, इंजिन नं. DKYCHC2645९, मॉडेल जून २०१७, रंग एबोनी ब्लॅक मेट) पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने ही मोटारसायकल चोरून नेली आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 16-07-2025














