पावस : रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले पंचक्रोशीत विजेचा खेळखंडोबा वारंवार घडत असून, नागरिक त्रस्त झाले असून, त्यासाठी ग्रामस्थ विद्युत मंडळाच्या कार्यालयावर धडकणार आहेत.
गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असून, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. डोलेंसह अनेक गावांमध्ये दोन दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहत असून त्या भागातील लोकांचे विजेअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यात त्वरित सुधारणा न झाल्यास वीज कार्यालयावर धडक देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी दिला आहे. वीजबिलांची वसुलीसाठी तत्परता दाखवणारे महावितरणचे अधिकारी वीजपुरवठ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्यांपासून जनता पूर्ण हतबल झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. यामध्ये सुधारणा न झाल्यास महावितरणविरोधात शेवटी नाइलाजास्तव आंदोलनाचा अवलंब करावा लागेल, असे शेवटी संतोष पोकडे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 16/Oct/2024