कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राला कन्यारत्न!

Sidharth Malhotra and Kiara Advani welcomes Baby Girl : बॉलिवूडमधील हॉट अँड फिट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आई-बाबा झाले आहेत. मंगळवारी या जोडप्याला कन्यारत्न प्राप्ती झाली.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने फेब्रुवारीमध्ये तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. इंस्टाग्रामवर गोंडस लहान बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर करून त्यांनी गुड न्यूज शेअर केली होती. त्यानंतर आज कियाराने गोंडस मुलीला जन्म दिला आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ‘नन्हीं परी’चा बाबा झाला. कियारा किंवा सिद्धार्थ यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सेलिब्रिटी पापाराझी अकाउंट व्हायरल भयानी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि कियारा आई झाल्याची माहिती दिली आहे.

सिद्धार्थ-कियाराचं आधी डेटिंग, मग लग्न…

कियारा आणि सिद्धार्थ २०२० पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी २०२३ मध्ये लग्न केले. त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघेही आता एका गोड मुलीचे आई-बाब झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 16-07-2025