राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गणांमधील पुनर्रचनेत राजापूर तालुक्यात पूर्वीचेच म्हणजे सहा जिल्हा परिषद गटांसह त्या अंतर्गत १२ पंचायत समिती गण कायम राहणार असले तरी जिल्हा परिषदेचे सहाही गट नवीन नावाने ओळखले जातील, तर चार पंचायती समितीचे गण हे पूर्वीच्याच नावाने रहाणार असून आठ गण नवीन नावाने अस्तित्वात आले आहेत.
दरम्यान या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना हरकती सादर करण्याची मुदत २१ जुलैपर्यंत देण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यात गेली दोन दशके सहा जिल्हा परिषद गटांसह त्या अंतर्गत बारा पंचायत समितीचे गण होते. त्यात ओणी, पाचल, केळवली, कोदवली, सागवे, देवाचे गोठणे असे सहा गट तर ओणी, ओझर, पाचल, ताम्हाणे, केळवली, कोंडये तर्फे सौन्दळ, सागवे, अणसुरे, देवाचे गोठणे, साखरी नाटे, कोदवली, भालावली असे बारा पंचायत समिती गण अस्तित्वात होते. मध्यंतरी झालेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचनेत तालुक्यात एक जि.प. गट, तर त्याअंतर्गत दोन जि.प. गण वाढून एकूण ७ जि.प. गटासह १४ पंचायत समिती गण अस्तित्वात आले होते. मात्र मधल्या काळात अनेक घटना घडल्या आणि अखेर जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे ठरले.
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे पूर्वीचेच प्रभाग रहाणार असले तरी त्यामध्ये ताम्हाणे, केळवली, साखरीनाटे, अणसुरे हे चार पंचायत समितीचे गण जुन्याच नावाने रहाणार आहेत. उर्वरीत सर्व जि.प. गट आणि आठ पं. स. गण नवीन नावाने ओळखले जाणार आहेत.
दरम्यान, या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना, हरकती नोंदवण्याची मुदत २१ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. तालुक्यातून किती सूचना व हरकती नोंदवल्या जातात याकडे येथील राजकीय धुरंधरांचे लक्ष लागून राहिले आहे.
नवीन पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट गावे-
१) वडदहसोळ (ओणी, मंदरूळ, चुनाकोळवण, कळसवली, वडवली कोंडीवळे, खरवते, वडदहसोळ, शिवणे बुद्रुक), २) रायपाटण (ओझर, सौंदळ, कोळवण खडी, येळवण, ओशिवळे, वाटुळ, आडवली, रायपाटण, परटवली), ३) तळवडे (पाचल, कारवली, येरडव, करक, पांगरीखुर्द, झर्ये, तळवडे, परुळे, हरळ), ४) ताम्हाणे (ताम्हाणे, अजिवली, हातदे, मूर कोळंब, काजिर्डा, मिळंद, जवळेथर, तुळसवडे), ५) केळवली (केळवली, मोरोशी, तळगाव, ससाळे, हसोळ तर्फे सौन्दळ, मोसम, पांगरी बुद्रूक, दोनिवडे, आंगले, फुफेरे), ६) जुवाटी (कोंडयेतर्फे सौंदळ, प्रिंदावन, जुवाटी डोंगर, विल्ये, महाळुंगे, पन्हळे तर्फे सौंदळ, वालये, शेजवली, हातिवले, कणेरी उन्हाळे), ७) धोपेश्वर (कोदवली, शेढे, कोंढे तर्फे राजापूर, शीळ, चिखलगाव, गोठणे, दोनिवडे, धोपेश्वर, गोवळ), ८) पेंडखले (भालावली, भू, तेरवण, कोतापूर, खिणगिणी, दसूर, देवीहसोळ, पेंडखले), ९) नाटे (कशेळी, कोंडसर बुद्रूक, राजवाडी, वाडापेठ, मोगरे, नाटे, आंबोळगड), १०) साखरीनाटे (साखरीनाटे, देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, शिवणेखुर्द, सोलगाव), ११) अणसुरे (अणुसरे, दळे, कुवेशी, पडवे, जैतापूर, मीठगवाणे, माडबन, साखर, निवेली, जुवे, जैतापूर), १२) कातळी (सागवे, नाणार, कुंभवडे, तारळ, उपळे)
नवीन जिल्हा परिषद गट
१) वडदहसोळ, २) तळवडे, ३) जुवाटी, ४) धोपेश्वर, ५) साखरी नाटे ६) कातळी.
नवीन पंचायत समिती गण
१) वडदहसोळ, २) रायपाटण, ३) तळवडे, ४) ताम्हाणे, ५) केळवली, ६) जुवाटी, ७) धोपेश्वर ८) पेंडखले, ९) नाटे, १०) साखरीनाटे, ११) अणसुरे, १२) कातळी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 16/Jul/2025









