रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे रस्त्यावर चिंतामणी हॉस्पिटल जवळ अज्ञात चालकाने गायीला धडक देऊन अपघात केला. यामध्ये गाय मृत झाली. अज्ञात वाहन चालकांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी अज्ञात वाहन चालकाने साळवी स्टॉप ते परटवणे जाणाऱ्या रस्त्यावर चिंतामणी हॉस्पीटल येथील रस्त्यावर गायीला ठोकर दिली. या ठोकरीत गाय मृत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बालाजी धुमाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर व ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 16-07-2025














