रत्नागिरी : कर्करोग हा जगभरात होणाऱ्या मृत्यूसाठीचे आघाडीचे कारण ठरत आहे. ऑक्टोबर हा महिना स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. यानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि संकेत, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल जनजागृती तसेच नियमित चाचणी केल्यास स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यावर तो पूर्ण बरा करता येऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखली गेली तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. तरुण वयात स्तनांचा कर्करोग ‘अॅग्रेसिव्ह’ असतो. यामागील काही कारणांपैकी, हार्मोन्समध्ये बदल, उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा, मुले होऊ न देणे व अयोग्य स्तनपान ही काही कारणे आहेत. या रोगाच्या लक्षणांची जनजागृती गरजेची आहे. त्यासाठी स्तनातील किंवा काखेमधील गाठीची त्वरित तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. या रोगाबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात ३० पैकी एक महिलेला कॅन्सर
शहरात ३० पैकी एक महिलेला, तर ग्रामीण भागात ६० पैकी एका महिलेला हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी ३० टक्के रुग्ण हे स्तनाचा कर्करोगाचे असतात. या रोगाचे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात निदान होण्याचे प्रमाण ५० टक्के आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 16/Oct/2024











