रत्नागिरी : मोटारसायकलवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मेघा टोलू डोर्लेकर ( ५०, रा. रत्नागिरी) यांचा कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघा डोर्लेकर या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना गावडे आंबेरे गावाच्या हद्दीत त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.
रत्नागिरीतील डॉक्टरांनी पुढील अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच १४ जुलै २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून पूर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 17-07-2025














