गणपतीपुळे : भारत स्वच्छ मिशनचा टप्पा क्रमांक २. १ हा २ ऑक्टोबर २०२० ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत रत्नागिरी तालुक्यातून निवडलेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीची पाहणी रविवारी केंद्रस्तरीय पथकाकडून करण्यात आली.
या पथकाने स्वच्छ सर्वेक्षण निकषांनुसार शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वैयक्तिक व दिव्यांग कुटुंबाना भेट देऊन स्वछतागृह व परिसराची पाहणी केली. तसेच शोषखड्डे, कचरा विलगीकरण शेड, हँडवॉश स्टेशन, परसबाग निर्मिती, रस्ते सफाई, गांडूळखत प्रकल्प, गटारे यांची पाहणी या केंद्रस्तरीय पथकाने केली व शिक्षक, अंगणवाडी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, बचतगत कर्मचारी, नागरिकांशी संवाद साधला. या समितीत भारतात तपासणीचा मक्ता मिळालेल्या संस्थेचे अमोल राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. पाणी गुणवत्ता तालुका समन्वयक अधिकारी सविनय जाधव, कृषि विस्तार अधिकारी अक्षय शिंदे आदी अधिकारी यांनी काम पाहिले. तसेच नांदिवडेचे ग्रामसेवक संदीप जाधव व सैतवडेचे ग्रामसेवक ओमकार शिर्के यांनी सहकार्य केले.
यावेळी सरपंच सतिश धुळ उपसरपंच चंद्रकांत मालप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण मोर्ये, ग्रामसेवक श्रीकांत कुळ्ये, ग्रा.पं. सदस्य अजय काताळे, प्रणाली मालप, समीक्षा घाटे, ममता बंडवे, निकिता शिगवण, ग्रा.पं. कर्मचारी किरण वलेकर, विश्वनाथ बैकर, रोहिदास मालप, राजश्री गोताड, मुख्याध्यापक सुभाष पालये, सुशील वासावे, महेश राहणे, प्रकाश मालप, चित्रा बैंकर, कमल मालप, रूपाली घोसाळे, सुजाता खापले, नेहा पवार, संगीता मोर्ये, समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी, अमोल भोके, पुनम लाड, लवंदे, श्रीकांत खापले, रुपाली बैकर, सारिका खापलेउपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 17/Jul/2025














