राजापुरात जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

राजापूर : गणेशोत्सवानिमित्त जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत आमदार किरण सामंत सन्मान जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांमध्ये खेळविली जाणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना रोख, चषक आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येणार आहेत. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी हे काम पाहणार असून स्पर्धा प्रमुख म्हणून एकनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका येत्या बुधवारी (ता. २३) सायंकाळी वाजेपर्यंत तालुका प्रतिनिधीकडे नोंदवायची आहेत. त्यासाठी प्रदीप परचुरे (गुहागर), विनायक जोशी (रत्नागिरी), राहुल भस्मे, मोहन हजारे (देवरूख), प्रकाश कानिटकर, दीपक वाटेकर (चिपळूण), मनमोहन बेंडके (संगमेश्वर), मनोज जाधव (लांजा), योगेश आपटे (खेड), मनोज सप्रे (राजापूर), माधव शेट्ये (दापोली) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, राकेश दांडेकर, श्रीकृष्ण राऊत, सुनील करगुटकर, प्रसाद माजरेकर, प्रदीप भाटकर, सुरेंद्र देसाई, सुचय रेडीज, मिलिंद साप्ते, नितीन लिमये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 17/Jul/2025