उपलब्ध संसाधनाप्रमाणे लोकसंख्या आवश्यक : प्रा. हनुमंत सुतार

मंडणगड : पृथ्वीवर उपलब्ध संसाधनांचा विचार करता समाजशास्त्रज्ञ झिम्मरमन यांच्या विश्लेषणानुसार चारशे कोटी लोकसंख्या असणे आवश्यक आहे. परंतु, असे असताना प्रत्यक्षात सव्वाआठशे कोटी इतकी जगाची लोकसंख्या आताच झाली आहे. संसाधनाची कमतरता असणाऱ्या भारतासारख्या अनेक विकसनशील देशात लोकसंख्या तुलनेत जास्त आहे, तर मुबलक संसाधने असणाऱ्या मोजक्या विकसित देशात लोकसंख्या खूप कमी आहे, असे प्रा. हनुमंत सुतार यांनी सांगितले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, डॉ. मुकेश कदम, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, प्रा. अशोक कंठाळे आदी उपस्थित होते.

प्रा. हनुमंत सुतार यांनी जागतिक व भारतीय लोकसंख्या वाढीचा आढावा घेताना कोणत्या देशात लोकसंख्या जास्त व कमी आहे हे सांगून त्यामागील कारणे विषद केली. लोकसंख्यावाढीचे प्रभावी नियंत्रण करताना लोकसंख्येच्या गुणात्मक बाबीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 17/Jul/2025