पुनस-आगवे रस्त्यावर खड्डेच खड्डे

पावस : लांजा ते पावस या मार्गावरील पुनस ते आगवे यादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर चिरा वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कायम अवजड वाहतूक सुरू असल्याने आगवे ते पुनस यादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे दुचाकी चालवणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर जांभा दगडाचे अवजड वाहने मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्यामुळे या खड्ड्यांची रुंदी दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे खड्डे रुंदावत चालले आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे.

यासंदर्भात दुचाकीस्वार परशुराम पाष्टे म्हणाले, सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालवणे धोकादायक आहे. या खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान होत आहे. खड्डे बुजवल्यास काही प्रमाणात प्रवास सुखकर होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 17/Jul/2025