लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे मंगळवारी रोजगार मेळावा

रत्नागिरी : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मंगळवार, २२ जुलै रोजी लोटे परशुराम येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशन (प्लॉट नं. ४०, एम.आय.डी.सी., ता. खेड) येथे होणार आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने कॉरटेव्हा क्रॉप इंडिया प्रा. लि., एम.ई.एस.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, एक्सल इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि घर्डा केमिकल प्रा. लि. या आस्थापनांचा समावेश आहे. या कंपन्यांनी विविध पदांसाठी ४५० मनुष्यबळाची मागणी नोंदवली आहे.

जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

इच्छुकांनी २२ जुलै २०२५ रोजी मुलाखतीच्या ठिकाणी बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 17-07-2025