रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. जुलै २०२५ चा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. २१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव (जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती) यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार तक्रार सोडविली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 17/Jul/2025














