महिला व विद्यार्थिनींसाठी रोजगाराभिमुख संधी – “रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण” कोर्ससाठी प्रवेश सुरू!

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगांव रत्नागिरी तर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र क्र. 7352-A) यांच्या संयुक्त विद्यमाने “रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण (Patient Assistant)” या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रमाणपत्र प्रशिक्षणक्रम (Program Code – C-177) हा अभ्यासक्रम 1 वर्ष कालावधीचा (अर्धवेळ) असून, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाद्वारे महिलांना आणि विद्यार्थिनींना आरोग्यसेवेशी संबंधित रोजगारासाठी सक्षम बनवण्याचा उद्देश या कोर्समागे आहे.

या अभ्यासक्रमाला प्रवेश पात्रता 10 वी पास / नापास / रेग्युलर पदवीसह डिस्टन्स लर्निंग मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच रुग्णालयात काम करत असलेले किंवा काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेले असलेले व 7 वी पास असलेले महिलां यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.

महिलांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण,अनुभवी प्रशिक्षण स्टाफ, रुग्णसेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित व्यावहारिक प्रशिक्षण, स्वयंरोजगाराची व विविध रुग्णालयांत रोजगार संधी आदी वैशिष्ट्ये या अभ्यासक्रमाची असणार आहेत.

सध्या लहान मोठ्या शहरामध्ये तसेच गावागावातून रुग्णांची काळजी घेण्यास प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. या कोर्समुळे महिलांना आणि विद्यार्थिनींना नर्सिंग होम्स, हॉस्पिटल अटेंडंट, घरगुती केअरटेकर वृद्धाश्रम, अशा क्षेत्रांत काम करण्याची संधी उपलब्ध होते. आरोग्यसेवा क्षेत्रात सतत वाढणाऱ्या गरजा लक्षात घेता, हा कोर्स भविष्यातील करिअरसाठी एक मजबूत पायरी ठरू शकतो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप अर्धवेळ स्वरूपाचे असल्यामुळे महाविद्यालयीन
विद्यार्थीनीना पदवी शिक्षण घेताना सोबत हा कोर्स करता येऊ शकतो. तसेच गृहिणी, व नोकरीं करणाऱ्या इच्छुक महिलांना सुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करून रुग्ण सहाय्यक म्हणून काम करू शकतात.

हा अभ्यासक्रम ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याने तसेच प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांना त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेश नोंदणी असल्याने अधिक माहितीसाठी संपर्क:📞 7666504243 / 7499821369 पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी येथे संपर्क करावा. स्वतःहुन नोंदणी करणार असल्यास विद्यापीठाच्या खालील संकेत स्थळावर जाऊन सेंटर कोड व अभ्यासक्रम कोड टाकून प्रवेश घेऊ शकतात.

ऑनलाईन प्रवेशासाठी संकेतस्थळ:🌐 www.ycmou.ac.in | http://ycmou.digitaluniversity.ac

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 17/Jul/2025