चिपळूण : येथील नगर पालिकेला वाहन ताफ्यात नवीन अत्याधुनिक शववाहिकेचे आगमन झाले आहे. शासनाकडून मंगळवारी ही शववाहिका चिपळुणात दाखल झाली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी श्रीफळ वाढवत या वाहनाचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः या शववाहिकेचे स्टिअरिंग हाती घेत वाहनांतील सुविधा जाणून घेतल्या.
उपसंचालक, आरोग्यसेवा, परिवहन, पुणे या कार्यालयाकडून जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर दोन अशा एकूण तीन शववाहिका जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने त्यातील एक शववाहिका चिपळूण नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या शववाहिकेचे उदघाटन मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झाले. या शववाहिकेचे इंधन, देखभाल व दुरुस्ती, अन्य खर्च चिपळूण पालिकेला करावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 18/Jul/2025














