सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला ३ वातानुकूलित डबे

खेड : कोकण मार्गावरून नियमितपणे धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे या एक्स्प्रेसला कायमस्वरूपी तीन वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस १५ जुलैपासून अतिरिक्त डब्यांची धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या एक्स्प्रेसला सध्या दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले होते. या संरचनेत बदल करत एक वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे. एक्स्प्रेस १७ डब्यांची धावेल. कायमस्वरूपी ३ वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 PM 18/Jul/2025