चिपळूण : गणेशोत्सव आटोपल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी चिपळूण आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्याच्या संगणकीय आरक्षणाला ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली. चिपळूण आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, भाईंदर, विठ्ठलवाडी, पुणे, बारामती या मार्गावर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसव्यतिरिक्त जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एसटीच्या प्रवासामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ६५ वर्षावरील व महिला प्रवाशांना ५० टक्के दरात प्रवास या सुविधा उपलब्ध असून, मागणीनुसार तालुक्यातील विविध गावांतून ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 18/Jul/2025














