जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील ब्रिटिश राजवटीत १८५१ साली स्थापित झालेल्या जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा क्र. १ च्या शतकोत्तर अमृत महोत्सवला ५ ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे. मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेमध्ये शैक्षणिक, सामाजिक पर्यावरणविषयक कृती उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविधांगी विकासासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवानिमित्त अमृत महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्त परिसरातील १९६० सालच्या तसेच अलिकडच्या काळातील अनेक माजी विद्यार्थी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या उत्साहाने एकत्रित आले आहेत. या महोत्सवाचे औचित्य साधून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण संदर्भात भरीव स्वरूपाचे उपक्रम राबवण्यावर ही शाळा भर देणार आहे. यामध्ये वृक्ष लागवड, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्तोत्र पाठांतर, संविधान पाठांतर, कथाकथन चित्रकला, रांगोळी स्पर्धा, समूहगीत गायन, देशभक्तीपर गीत गायन, क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे नियोजन माजी विद्यार्थ्यांच्या सहकायनि करण्यात येत आहे.
मुख्याध्यापिका प्रिया शिर्के यांच्याकडे संपर्क साधून या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सर्व उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळेचे माजी विद्यार्थी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 18/Jul/2025













