देवरुख : येथील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये ग्रामीण भागातील मुलांना इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सची माहिती मिळावी या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विज्ञान समजण्याची, प्रात्यक्षिके करून अनुभवण्याची आणि वैज्ञानिक व संशोधनात्मक विचार करण्याची संधी मिळावी, या हेतूनेही कार्यशाळा घेण्यात आली.
‘इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स’ या विषयावर सांगली येथील तज्ज्ञ नितीन नाईक यांचे मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एकूण १४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही कार्यशाळा यशस्वी विज्ञान करण्यासाठी केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी मेहनत घेतली.
या कार्यशाळेला मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रतिसादाने आमचा उत्साह वाढला असून अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम आणण्याची प्रेरणा आम्हा सर्वांना मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानविकासामध्ये आणि कोकण परिसराच्या विकासामध्ये कोकणातील हे पहिले बालविज्ञान केंद्र नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आहे. असे सृजन विज्ञान केंद्राचे संस्थापक सदानंद भागवत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 18/Jul/2025














