खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी येथील कामाक्षी पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एर्टिगा कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेने तात्काळ धाव घेतली आणि जखमींना तत्काळ उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.
प्राथमिक दृष्ट्या दुचाकीस्वाराने कारला पाठीमागून धडक दिल्याचे पाहावयास आहे. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 18/Jul/2025














