रत्नागिरी : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या संचलनात अनुचित प्रकार घडून दोन धर्मीयांमधील वातावरण बिघडले. त्यानंतर घडलेल्या एका घटनेत पोलिसांकडून लाठी चार्ज देखील करण्यात आला. या लाठी चार्जची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेनेकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, तारक मयेकर, नितीन लिमये आदी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.














