रत्नागिरी : कोटा येथील कॅप्सन इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे अकरावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शनिवारी, दि.१९ जुलै रोजी रत्नागिरीत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
दुपारी ४ ते ६ यावेळेत फाटक हायस्कूल सभागृहात डॉ. महेश अभ्यंकर जेईई-नीट परीक्षेसाठी यशाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. महेश अभ्यंकर वैद्यकीय सल्लागार, फार्मास्युटीकल तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते संशोधक, लेखक आहेत. त्यांनी १५०० वैद्यकीय चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचे ५० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विनायक निकम (८०५५०३७२२२) यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 19-07-2025














