गावखडी गावातील विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करण्याची भाजपाची मागणी

रत्नागिरी : मौजे गावखडी गावातील कुंभारवाडी, पड्यारवाडी, नानकरवाडी, पवारवाडी, गुरववाडी या परिसरामध्ये गेले सात ते आठ दिवस विद्युत पुरवठा बंद आहे. यामुळे या वाडीतील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय झाली आहे. तरी सदर वाडीतील विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन महावितरण कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हाअध्यक्ष राजेश सावंत, भाजपा उत्तर तालुकाअध्यक्ष विवेक दादा सुर्वे, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, दक्षिण तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, दक्षिण तालुका उपाध्यक्ष राजेश पाथरे, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते पपन लिंगायत, गिरीश कुलापकर आदी उपस्थित होते.