रत्नागिरी : सायबर संस्कार कार्यक्रमात डॉ. अक्षय फाटक करणार मार्गदर्शन

रत्नागिरी : समाजात सध्या ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, उच्चभ्रू अशा व्यक्तींची सायबर फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी समाजावर सायबर संस्कार होण्याची गरज आहे. यासाठी रत्नागिरी नगरपालिका व रत्नागिरी पोलिसांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा सायबर संस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.

येत्या ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. दैनंदिन जीवनाचा एक मोठा आधार किंवा घटक झालेल्या मोबाईलचा सध्या चाललेला गैरवापर रोखण्यासाठी मोबाईल कसा वापरावा, तो कसा वापरू नये यासंदर्भात सायबर संस्कार कार्यक्रमात डॉ. अक्षय फाटक मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानाचा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, महिला, नागरिक, ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी नगर परिषद व रत्नागिरी पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 19/Jul/2025