चिपळुणात विद्युत साहित्य चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, मुद्देमाल जप्त

चिपळूण, [१९ जुलै, २०२५]: चिपळूण शहरातील मराठी शाळेजवळ आणि राजेश खेडेकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून विद्युत साहित्य चोरीला गेल्याची घटना १८ जुलै २०२५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, चोरी गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे.

याबाबत विवेक वसंत भोजने (वय ३४, व्यवसाय ठेकेदार, रा. कापसाळ यशोधानगर) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, १८ जुलै २०२५ रोजी रात्री १.१५ वाजेच्या सुमारास कापसाळ मराठी शाळेजवळ ठेवलेले त्यांचे सुमारे ७० हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनीअम कंडक्टर वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

पोलिसांनी तातडीने तपास करत या प्रकरणी अकबर इकरार शेख (वय २१, रा. कापसाळ, मूळ रा. उत्तरप्रदेश) आणि मिहीर मिलींद नाचणकर (वय २१, रा. कापसाळ केळस्कर चाळ, मूळ रा. आंबेशेत बौध्दवाडी, ता. रत्नागिरी) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले ७० हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनीअम कंडक्टर वायरचे बंडल आणि गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपये किंमतीची पेंशन प्रो (क्रमांक एम एच ०८ ए इ ०३९०) ही गाडी जप्त केली आहे.

चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 19-07-2025