रत्नागिरी : जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एक लाख ७२ हजार ४५७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ३३ हजार ३१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. अद्याप ३९ हजार १४२ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी न केल्यामुळे शासनाच्या २० व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे.
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी पासून प्रधानमंत्री २०१९ पासून किसान सन्मान निधी योजना, तर राज्यशासनाने २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंमलात आणली आहे; मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वपूर्ण आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात एक लाख ७२ हजार ४५७ लाभार्थी ठरले आहेत. त्यापैकी १४ जुलैपर्यंत एक लाख ३३ हजार ३१५ शेतकऱ्यांनी
नोंदणी केली असली तरी ३९ हजार १४२ शेतकऱ्यांनी नोंदणीच केली नसल्यामुळे त्यांना पीएम किसानच्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक कला आहे. जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक नोंदणीमध्ये सर्वाधिक नोंदणी चिपळूणमधून करण्यात आली आहे.
सर्वांत कमी नोंदणी रत्नागिरी तालुक्यात झाली आहे. लाभार्थी संख्येपेक्षा फार्मर आयडी नोंदणी केलेल्यांची संख्या कमी आहे. पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे; मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले
पीएम किसान अनुदानासाठी फार्मर आयडी नसलेले तालुक्यातील शेतकरी
मंडणगड – १५७२, दापोली-६०३०, खेड-३८३५, गुहागर ४०९५, चिपळूण-२० हजार २९७, संगमेश्वर-६१४१, रत्नागिरी– ८२२४, लांजा-१४७, राजापूर-४८२५.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 19/Jul/2025














