शंकराचार्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात घडलेल्या विविध घटनांवरून एक वेगळेच राजकारण घडत असल्याचा संशय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संदर्भ विविध माध्यमातून माझ्याशी कसा जोडता येईल आणि मला कसे टार्गेट करता येईल असे प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आल्याचा खुलासा सामंत यांनी केला. पत्रकार परिषदेत तसे पुरावे देत त्यांनी विरोधकानं सडेतोड उत्तरे दिली. याबाबत सांगताना सामंत म्हणाले की एमआयडीसी मध्ये गोवंश अवयव सापडल्यावर मी तत्काळ पोलीस यंत्रणेला सांगितले की गाय आमच्यासाठी देव आहे. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याप्रमाणे एकावर कारवाई देखील झाली.
दिल्लीला जाऊन घेतली शंकराचार्यांची भेट
पत्रकार परिषदेत सांगताना सामंत म्हणाले की ही घटना घडल्या नंतर मी दिल्ली येथे जाऊन शंकराचार्यांची भेट घेतली. या भेटीत त्यानी मला सांगितले की राष्ट्र माता गो माता करावं असे हिंदू धर्माचे म्हणणे आहे. यावर महाराष्ट्र सरकार काय करणार ? याबाबत भूमिका जाहीर करावी. तातडीने मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून ती फाईल देखील मी तयार केली हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहित आहे. त्यावर सर्वांच्या सह्या घेतल्या, त्याचे फलित हे की देशामध्ये पहिल्यांदा राज्य माता गो माता हा दर्जा आपल्या पूजनीय गाईला देण्यात माझा खारीचा वाटा आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेने स्वागत केलं आहे. राज्य सरकारने गाईंना राज्यमाता दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावरून आपल्याला समजलेच असेल की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचसोबत माझ्या स्वतःकडून गो मातेसाठी रुग्णवाहिक देण्याचा प्रस्ताव देखील मी गोप्रेमी नागरिकांसमोर ठेवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 17/Oct/2024














